हवामान अंदाज 5 जून: दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोंकण मध्ये पाऊस

June 4, 2019 7:14 PM | Skymet Weather Team

दक्षिण भारतात, एक उत्तर दक्षिण ट्रफ रेषा मध्य भारता पासून दक्षिण आंतरिक कर्नाटक पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, कर्नाटक आणि केरळ, व उत्तर आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तेलंगाणा मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती बांगलादेशवर बनलेली आहे, ज्यामुळे उत्तर पूर्व राज्यासह पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. पूर्व बिहार, झारखंड आणि ओडिशा मध्ये पावसाची अपेक्षा आहे. पूर्व उत्तर प्रदेश मध्ये पूर्व दिशेने वारे वाहतील ज्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश मध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर नोंदवला जाईल.

मध्य भारतात, एक ट्रफ रेषा उत्तर पूर्व मध्य प्रदेश पासून दक्षिण भारता पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोंकण व गोव्यावर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण छत्तीसगढ मध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल. दुसरीकडे, मध्य प्रदेश, विदर्भ, दक्षिण राजस्थान आणि गुजरात मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

 

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तान आणि लगतच्या उत्तर राजस्थानवर बनलेली आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड व पंजाब मध्ये पावसाची शक्यता आहे. हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये धुळीचा वादळासह पावसाची अपेक्षा आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES