दक्षिण मध्ये, एक उत्तर दक्षिण ट्रफ रेषा झारखंड पासून दक्षिण आंतरिक कर्नाटक पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे केरळ, अंतर्गत तामिळनाडू, कर्नाटक, रायलसीमा आणि तेलंगाणा मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर पावसाचा जोर वाढेल.
पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती झारखंड आणि त्याच्या आसपास बनलेली आहे. एक ट्रफ रेषा मिझोराम पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल मध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर पूर्व भारतात पाऊस पडत राहील. पूर्व उत्तर प्रदेश मध्ये पूर्व दिशेने उष्ण वारे वाहतील, ज्यामुळे तापमानात घट दिसून येईल.
मध्य भारतात, दक्षिण राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये हवामान कोरडे राहील. दुसरीकडे, दक्षिण छत्तीसगड आणि विदर्भ मध्ये पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोंकण व गोव्याच्या दक्षिण भागांवर हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबई मध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, नागपूर, परभणी, लातूर, कोल्हापूर, सांगली, सातारा येथे एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पूर्व भारता पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच, पंजाब आणि उत्तर राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे.
Any information taken from here should be credited to skymetweather.com