हवामान अंदाज 3 जून: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये पावसाची शक्यता

June 2, 2019 9:03 PM|

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा तेलंगणा, रायलसीमा आणि दक्षिण आंतरिक कर्नाटकच्या आसपास विस्तारलेली आहे, ज्यामुळे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. दुसरीकडे, तेलंगाणाच्या उत्तर भागांवर उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

मध्य भारतात, उत्तर पश्चिम दिशेने कोरडे आणि गरम वारे वाहत आहे, ज्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. याशिवाय, उत्तर पूर्व मध्य प्रदेशावर बनलेल्या चक्रवाती परिस्थितीमुळे व छत्तीसगड पर्यंत विस्तारलेली ट्रफ रेषेमुळे महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये पावसाची शक्यता आहे.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एक चक्रवाती परिस्थिती असमवर बनलेली आहे. एक पूर्व पश्चिम ट्रफ रेषा उत्तर पूर्व भारताच्या आसपास विस्तारलेली आहे ज्यामुळे उत्तर पूर्व राज्यांवर पावसाची अपेक्षा आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तानवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या आसपास विस्तारलेली आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये पावसाची अपेक्षा आहे. पंजाब मध्ये धुळीचे वादळ दिसतील, दुसरीकडे, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश मध्ये हवामान गरम आणि कोरडे राहील. राजस्थान मध्ये तीव्र उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

author image