Skymet weather

हवामान अंदाज 29 जून: मुंबईसह कोंकण व गोव्या मध्ये जोरदार पावसाची शक्यता

June 28, 2019 7:16 PM |


दक्षिण पश्चिम मान्सूनची उत्तर अरब सागर, गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये प्रगती झाली आहे. मान्सूनची उत्तर सीमा द्वारका, अहमदाबाद, भोपाळ, जबलपूर, सुलतानपूर, लखीमपूर खेरी आणि मुक्तेश्वरला पार करून पुढे जात आहे. मुंबई मध्ये पावसाचा जोर वाढलेला. सध्या, एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण राजस्थान आणि लगतच्या दक्षिण पश्चिम मध्य प्रदेशावर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा कोंकण व गोव्यापर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे सुरत, वलसाड, नवसारी आणि मुंबईसह कोंकण व गोव्या मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील अनुभवण्यात येईल.

उत्तर पूर्व भारतात पावसाचा जोर आता कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण असमवर बनलेली आहे. याशिवाय, उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीवर एक चक्रवाती परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पावसाचा जोर उत्तर पूर्व भारतात कमी होईल. तथापि, उप हिमलायी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि असम मध्ये हलका पाऊस पडत राहणे अपेक्षित आहे. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि गंगीय पश्चिम बंगाल मध्ये पावसाचा जोर कमी राहील॰  

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

दक्षिण भारतात, कोण्हीती महत्वपूर्ण हवामान प्रणाली नाही बनलेली आहे ज्यामुळे उत्तर कर्नाटकच्या किनारी भागांवर व उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनारी भागांवर हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. अंदमान व निकोबारवर चांगल्या पावसाची शक्यता आहे.उत्तर भारतात हवामान कोरडे राहील. तापमान सामान्यांपेक्षा जास्त राहील. दिल्ली मध्ये तापमान ४० अंशाचा वर जाऊ शकतो. तथापि, जम्मू काश्मीर मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची अपेक्षा आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try