मुंबई मान्सून बद्दल सांगायचे तर, एक ट्रफ रेषा दक्षिण गुजरात पासून उत्तर कर्नाटकच्या किनारी भागांपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्या मध्ये मध्यम स्वररूपाच्या मॉन्सूनच्या पावसाची अपेक्षा आहे. एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची देखील अपेक्षा आहे. दरम्यान दक्षिण पूर्व राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्या मध्ये हलक्या ते मध्यम मॉन्सूनच्या पावसाची शक्यता आहे.
अंदमान व निकोबार द्वीपसमूह आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये मध्यम पावसाची अपेक्षा आहे. याउलट, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये मॉन्सूनचा पाऊस कमी होईल, तथापि, आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये आणि तेलंगाणा मध्ये विखुरलेला पाऊस सुरु राहील.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
पूर्व आणि उत्तर पूर्व भारत, एक पूर्व पश्चिम ट्रफ रेषा बिहार पासून नागालैंड पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे उप हिमलायी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि असम मध्ये मॉन्सूनच्या पावसाची शक्यता आहे. एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील अनुभवण्यात येईल. ओडिशा आणि कोलकातासह गंगीय पश्चिम बंगाल मध्ये पावसाचा जोर वाढेल. दरम्यान, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश मध्ये मॉन्सूनचा जोर कमी होईल.
उत्तर भारतात उत्तर पश्चिम दिशेने कोरडे वारे वाहत आहे ज्यामुळे हवामान कोरडे राहील. तथापि, मध्य पाकिस्तानवर बनलेल्या चक्रवाती परिस्थितीमुळे जम्मू काश्मीर मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.
Any information taken from here should be credited to skymetweather.com