हवामान अंदाज 25 जून: मुंबईत मॉन्सूनचे आगमन होणे अपेक्षित, महाराष्ट्रात चांगला पाऊस

June 24, 2019 7:07 PM | Skymet Weather Team

मॉन्सून २०१९ ची कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये प्रगती झालेली आहे. मॉन्सूनची उत्तर सीमा अलिबाग, मालेगाव, खांडवा, छिंदवाडा, मांडला, पेंद्रा, सुलतानपूर, लखीमपूर खेरी आणि मुक्तेश्वरला पार करून पुढे जात आहे.

महाराष्ट्रात चांगला पाऊस सुरु राहणे अपेक्षित आहे. एक चक्रवाती परिस्थिती उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम मध्य प्रदेशावर बनलेली आहे ज्यामुळे मध्य महराष्ट्र, कोंकण व गोवा आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पण पडू शकतो. मुंबईत मॉन्सूनचे आगमन होणे अपेक्षित आहे आणि येथे चांगला पाऊस पडेल. याउलट, गुजरात, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि मराठवाड्या मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे.

उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती मेघालय आणि त्याच्या आसपास बनलेली आहे. याशिवाय, उष्ण वारे उत्तर पूर्व राज्यांवर वाहत आहे ज्यामुळे उत्तरात पूर्व भारतात पावसाचा जोर वाढेल. तथापि, असम आणि मेघालय मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. उप हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. याउलट, बिहार, झारखंड, ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगाल मध्ये पावसाचा जोर कमी राहील.

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा कोंकण आणि गोव्यापासून केरळ पर्येंत विस्तारलेली आहे. एक आणखी ट्रफ रेषा उत्तर मध्य महाराष्ट्र पासून अंतर्गत कर्नाटक पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे कर्नाटक आणि केरळ मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये विखुरलेल्या पावसाची अपेक्षा आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अंतर्गत तामिळनाडू मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर मध्यम ते जोरदार पाऊस पडत राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

सध्या, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर जमू काश्मीरवर बनलेला आहे. प्रभावाने एक चक्रावती परिस्थिती पंजाब आणि हरियाणावर बनलेली आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये धुळीचा वादळासह पावसाची अपेक्षा आहे. पावसामुळे तापमानात २ ते ३ अंशांनी घट दिसून येईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES