एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण छत्तीसगड आणि त्याच्या आसपास बनलेला आहे. एक ट्रफ रेषा दक्षिण भारता पर्येन्त विस्तारलेली आहे, ज्यामुळे छत्तीसगड आणि विदर्भ मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे आणि येथे मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे, उरलेल्या भागात हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. तथापि, मुंबई मध्ये मुख्यतः कोरड्या हवामानसः एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडत राहणे अपेक्षित आहे. मध्य प्रदेशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात हलक्या पावसाची अपेक्षा आहे. गुजरात मध्ये हवामान मात्र कोरडे राहील.
दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा पश्चिम किनारी भागांवर बनलेली आहे ज्यामुळे कर्नाटक मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू मध्ये काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
पूर्व आणि उत्तर पूर्व भारत, एक चक्रवाती परिस्थिती उप हिमालयी पश्चिम बंगाल आणि लगतच्या उत्तर पूर्व भारतात बनलेली आहे, ज्यामुळे उत्तर पूर्व भारतात, उप हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. ओडिशा, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि गंगीय पश्चिम बंगाल मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे.
एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तानवर बनलेला आहे. एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे, ज्यामुळे, जम्मू काश्मीर मध्ये हलक्या पावसाची अपेक्षा आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याउलट, राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये हवामान गरम आणि कोरडे राहील.
Any information taken from here should be credited to skymetweather.com