हवामान अंदाज 18 जून: चक्रीवादळ वायु कमी दाबाच्या पट्ट्यात परिवर्तित, मुंबईत आज आणि उद्या पावसाची शक्यता

June 17, 2019 6:56 PM | Skymet Weather Team

चक्रीवादळ वायु कमी दाबाच्या पट्ट्यात कमकुवत झाले आहे आणि सध्या कुटच क्षेत्रावर बनलेले आहे, ज्यामुळे गुजरात आणि लगतच्या दक्षिण राजस्थान मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोंकण व गोव्यावर मध्यम पावसाची अपेक्षा आहे. आज आणि उद्या मुंबईत पावसाळी क्रिया चालू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, चक्रीवादळ वायुच्या प्रभावाने वाहणारे दक्षिण-पश्चिम वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल. परिणामी, पावसाची तीव्रता कमी होईल. दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्या मध्ये हवमान कोरडे राहील.

पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती गंगीय पश्चिम बंगालवर आणि लगतच्या बांगलादेशवर बनलेली आहे. शिवाय, बंगालच्या खाडीतून उष्ण वारे वाहत आहे ज्यामुळे मणिपूर, मिझोराम आणि नागालैंड मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, उप हिमलायी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशा मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे.

याउलट, गंगीय पश्चिम बंगाल आणि झारखंड मध्ये हवामान कोरडे राहील. बिहार मध्ये एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

 

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरच्या पूर्व भागांवर बनलेला आहे. एक चक्रवाती परिस्थिती हरियाणा आणि त्याच्या आसपास बनलेली आहे ज्यामुळे, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये धुळीच्या वादळासह पावसाची अपेक्षा आहे. तापमानात देखील घट दिसून येईल.

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा गुजरात पासून कर्नाटकपर्येंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे कर्नाटक मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. केरळ आणि आंध्र प्रदेश मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. रायलसीमा, तेलंगाणा, तामिळनाडू आणि अंतर्गत कर्नाटक मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES