हवामान अंदाज 14 जून: चक्रीवादळ वायु महाराष्ट्र पासून दूर, महाराष्ट्राच्या किनारी भागात हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा

June 13, 2019 6:33 PM | Skymet Weather Team

अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु उत्तर पश्चिम दिशेत जात आहे आणि उत्तर अरब सागरच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गुजरातच्या किनारी भागांवर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, 80 ते 100 किमोमीटरच्या वेगाने वारे वाहतील व पोरबंदर, सोमनाथ, जुनागढ आणि द्वारका मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरातच्या अंतर्गत भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी भागात हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. तसेच, दक्षिण/ दक्षिण पूर्व राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची अपेक्षा आहे, छत्तीसगड मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, मध्य प्रादेश आणि आंतरिक महाराष्ट्र मध्ये हवामान कोरडे राहील. मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या तापमानात वाढ दिसून येईल.

कर्नाटक आणि केरळ मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. लक्षद्वीप व अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगाणा मध्ये काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. कर्नाटकच्या किनारी भागात जोरदार पाऊस अनुभवण्यात येत आहे ज्यामुळे असे म्हणू शकतो की येथे लवकरच मॉन्सूनचे आगमन होईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

 

एक चक्रवाती परिस्थिती मेघालय आणि त्याच्या आसपास बनलेली आहे. एक ट्रफ रेषा उत्तर पूर्व उत्तर प्रदेश पासून ओडिशा पर्यंत विस्तारलेली आहे ज्यामुळे उत्तर पूर्व राज्यात, उप हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ओडिशा आणि बिहारच्या पूर्व भागात काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, झारखंड आणि पश्चिम बंगाल मध्ये हवामान कोरडे राहील.

कोणतीही महत्वपूर्ण हवामान प्रणालीच्या अनुपस्थित, उत्तर पश्चिम भागात हवामान कोरडे राहील. कमाल तापमानात वाढ दिसून येईल व हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान मध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट परतण्याची शक्यता आहे. एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर मध्ये हलक्या पावसाची अपेक्षा आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES