गेल्या २४ तासात, केरळात दक्षिण पश्चिम मॉन्सून २०१९ चे आगमन झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे की दक्षिण पश्चिम मॉन्सूनची अजून प्रगती होईल व येणाऱ्या ४८ तासात, उत्तर पूर्व राज्यात मॉन्सूनचे आगमन होईल. याशिवाय, मॉन्सून केरळच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पाऊस देईल.
दक्षिण भारतात, एक संघटित कमी दाबाचा पट्टा दक्षिण पूर्व आणि लगतच्या पूर्व मध्य अरब सागरावर बनलेला आहे. ही हवामान प्रणाली डिप्रेशन मध्ये परिवर्तित होऊन, उत्तर/उत्तर पश्चिम दिशेत चालू लागेल. याशिवाय,एक ट्रफ रेषा महाराष्ट्राच्या किनारी भागांपासून केरळच्या किनारी भागांपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे, कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र व गोव्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा मध्ये काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.
उत्तर पश्चिम दिशेने गरम आणि कोरडे वारे वाहत आहे ज्यामुळे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड मध्ये गरम हवामानासह उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. याउलट, दक्षिण छत्तीसगड मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पश्चिम बंगालच्या खाडी व लगतच्या गंगीय पश्चिम बंगालवर बनलेली आहे. याशिवाय, गरम आणि उष्ण वारे देखील वाहत आहे ज्यामुळे सिक्कीम, पश्चिम बंगाल व उत्तर पूर्व राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. तसेच, बिहार, झारखंड आणि ओडिशा मध्ये हलक्या पावसाची अपेक्षा आहे.
उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तानवर बनलेला आहे ज्यामुळे जम्मू काश्मीरवर पावसाची शक्यता आहे. याउलट, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये गरम हवामानासह उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.
Any information taken from here should be credited to skymetweather.com