संपूर्ण महाराष्ट्रात हवामान गेल्या अनेक दिवसांपासून गरम राहिले आहे. कोरड्या आणि गरम हवामानाच्या परिस्थितीमुळे संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. खरं तर, विदर्भातील रहिवाशांना सतत तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाण उष्णतेच्या लाटांशी लढत आहेत. गेल्या २४ तासांत हवामान मुख्यतः कोरडे राहिले आहे, परंतु विदर्भातील काही भागात हलका पाऊस पडला आहे, त्यामध्ये अमरावतीमध्ये २ मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे आणि पुढील दोन दिवसात उष्णतेच्या लाटांपासून सुटका होणार नाही, असे दिसून येत आहे. त्यानंतर, २ किंवा ३ जून रोजी विदर्भातील काही भागात हलका पाऊस पडणे अपेक्षित आहे.
दक्षिण पश्चिम दिशेने वारे दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीवर वाहत आहे, ज्यामुळे कॉमोरीन क्षेत्रावर, दक्षिण पश्चिम आणि दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीवर व अंदमान सागरच्या काही भागांवर मॉन्सूनची प्रगती झाली आहे. एक ट्रफ रेषा पूर्व भारता पासून दक्षिण आंतरिक कर्नाटक पर्यंत विस्तारलेली आहे ज्यामुळे रायलसीमा, दक्षिण आंतरिक कर्नाटक, केरळ, आंतरिक तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक ट्रफ रेषा पूर्व उत्तर प्रदेश पासून मणिपूर पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे मेघालय आणि त्रिपुरा मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. सिक्कीम, पूर्व बिहार, झारखंड आणि ओडिशा मध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.
उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तानवर बनलेला आहे, प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे. ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये पावसाची शक्यता आहे. राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.
Any information taken from here should be credited to skymetweather.com