Skymet weather

हवामान अंदाज 8 जुलै: महाराष्ट्रात पाऊस सुरु राहणे अपेक्षित, मध्य प्रदेश मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

July 7, 2019 8:23 PM |

एक कमी दाबाचा पट्टा बिहारच्या पश्चिम भाग व लगतच्या पूर्व उत्तर प्रदेशवर बनलेला आहे, ज्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर पश्चिम झारखंड, सिक्कीम आणि उप हिमलायी पश्चिम बंगाल मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, दक्षिण झारखंड, ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगाल मध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची अपेक्षा आहे.

एक चक्रवाती परिस्थिती व ट्रफ रेषा असम आणि त्याच्या आसपास बनलेली आहे, ज्यामुळे मेघालय, असम आणि अरुणाचल प्रदेश मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. उत्तर भारतात, एक चक्रवाती परिस्थिती व ट्रफ उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागांवर बनलेली आहे ज्यामुळे उत्तराखंड, उत्तर पूर्व राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेश मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात पाऊस सुरु राहणे अपेक्षित आहे

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

याशिवाय, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरच्या उत्तर भागांवर बनलेला आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर आणि लगतच्या हिमाचल प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची अपेक्षा आहे. एक चक्रवाती परिस्थिती पाकिस्तानच्या मध्य भाग व लगतच्या पंजाबवर बनलेली आहे ज्यामुळे पंजाब आणि हरियाणा मध्ये धुळीच्या वादळासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये ढगाळ आकाशासह हवामान मात्र गरम आणि उश्णच राहणे अपेक्षित आहे.

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा महाराष्ट्र पासून उत्तर केरळ पर्येंत विस्तारलेली आहे. एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण गुजरात आणि लगतच्या उत्तर पूर्व अरबी समुद्रावर बनलेली आहे ज्यामुळे कर्नाटक आणि केरळ, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. याउलट, तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये हवामान मात्र कोरडेच राहणे अपेक्षित आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try