मध्य भारतात, एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण मध्य उत्तर प्रदेशवर बनलेला आहे, ज्यामुळे मध्य प्रदेश मध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. पावसाचा जोर राज्यातील उत्तर भागात जसे शिवपुरी, गुना, सागर, दमोह, राजगढ आणि ग्वालियर, या ठिकाणी जास्त राहील. दरम्यान, दक्षिण राजस्थान, कोंकण व गोवा आणि छत्तीसगडच्या भागात विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच, महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.
पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती असम आणि त्याच्या आसपास बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पंजाब पासून बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे उत्तर पूर्व राज्यात पावसाचा जोर वाढने अपेक्षा आहे. याशिवाय, पूर्व बिहार, झारखंड आणि ओडिशा मध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा आहे. पूर्व उत्तर प्रदेश मध्ये हलका पाऊस पडू शकतो.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
उत्तर भारतात एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या आसपास विस्तारलेली आहे ज्यामुळे उत्तराखंड आणि लगतच्या पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश मध्ये विखुरलेला पाऊस सुरु राहील. जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान आणि दिल्ली मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा कोंकण व गोव्यापासून केरळ पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे कर्नाटक मध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. याउलट, अंतर्गत कर्नाटक मध्ये हलका पाऊस पडेल, परंतु, तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये हवामान मात्र कोरडेच राहणार.
Any information taken from here should be credited to skymetweather.com