Skymet weather

हवामान अंदाज 31 जुलै: मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस, मुंबईत मध्यम सरी

July 30, 2019 7:18 PM |


मान्सूनची अक्षीय रेषा पश्चिम राजस्थान पासून उत्तर बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे.

एक चक्रवाती परिस्थिती मध्य प्रदेशच्या उत्तर मध्य भागांवर बनलेली आहे ज्यामुळे दक्षिण पूर्व राजस्थान मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, पूर्व राजस्थान, गुजरात, पश्चिम आणि मध्य मध्य प्रदेश, विदर्भ, कोंकण आणि गोवा, तसेच दक्षिण छत्तीसगढ मध्ये एक दोन जोरदार सरींची अपेक्षा आहे. विदर्भ, मराठवाडा, कोंकण व गोव्यातील राहिलेला भागात तसेच मध्य महाराष्ट्रातील भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. मुंबई मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु राहील.

उत्तर मध्ये, उष्ण वारे वाहत आहे ज्यामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह जम्मू काश्मीर मध्ये विखुरलेला पाऊस पडू शकतो. पंजाब आणि हरियाणा मध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील राहिलेल्या भागात एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

पूर्व आणि उत्तर पूर्व भागात, बंगालच्या खाडीतून उष्ण वारे वाहत आहे ज्यामुळे उप हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. एक दोन जोरदार सरींची देखील शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतातील राहिलेल्या भागात, तसेच बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये विखुरलेला हलका पाऊस पडेल. दक्षिण ओडिशा मध्ये एक दोन चांगल्या सरींची शक्यता आहे.

दक्षिण मध्ये कर्नाटक मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. उत्तर तेलंगाणा मध्ये हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. दक्षिण प्रायद्वीपवर मान्सून कमकुवत राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try