हवामान अंदाज 3 जुलै: विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस, मुंबईत पाऊस सुरु राहणे अपेक्षित

July 2, 2019 7:20 PM | Skymet Weather Team


दक्षिण पश्चिम मान्सूनची प्रगती पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि जम्मू- काश्मीर मध्ये झालेली आहे॰ मान्सूनची उत्तर सीमा द्वारका, अहमदाबाद, राजगढ, खजुराहो, लखनउ, नाजीबाबाद आणि मांडला पार करून पुढे जात आहे.

मुंबईत पावसाचा जोर किंचित कमी होणे अपेक्षित आहे तथापि मध्यम पाऊस पडत राहील, असे दिसून येत आहे. एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण पूर्व मध्य प्रदेश आणि लगतच्या विदर्भ मध्ये बनलेला आहे, ज्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. तसेच, दक्षिण पूर्व राजस्थान, गुजरात आणि कोंकण व गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस अनुभवण्यात येईल.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, बंगालच्या खाडीपासून उष्ण वारे वाहत आहे ज्यामुळे उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि उत्तर पूर्व भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, बिहारच्या उत्तर आणि पूर्व भागात काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. याउलट, झारखंड, ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगाल मध्ये पावसाचा जोर कमी होईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

दक्षिण मध्ये, मान्सून कमकुवत राहील. याउलट, तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये हवमान कोरडे राहील. याशिवाय, अंतर्गत कर्नाटक आणि केरळ मध्ये विखुरलेला हलका पाऊस पडत राहील. उत्तर कर्नाटकच्या किनारी भागात एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा मध्ये हलका पाऊस पडत राहील.

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीवर बनलेला आहे ज्यामुळे उत्तराखंड मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. हिमाचल, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडेल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES