हवामान अंदाज 29 जुलै: विदर्भात जोरदार पाऊस, मुंबई मध्ये मध्यम पावसाची शक्यता

July 28, 2019 7:13 PM | Skymet Weather Team

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरच्या उत्तर भागात व लगतच्या पाकिस्तानवर बनलेला आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उर्वरित उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थान मध्ये हवामान गरम आणि कोरडे राहील. तथापि, एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

मध्य भारतात, मान्सूनची अक्षीय रेषा राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडला पार करून उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे. एक चक्रवाती परिस्थिती राजस्थान व एक आणखी चक्रवाती परिस्थिती छत्तीसगढच्या मध्य भागांवर बनलेली आहे. ज्यामुळे, विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगड मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, छत्तीसगडच्या उर्वरित भागात, तसेच मध्य प्रदेशातील भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. दक्षिण राजस्थान आणि गुजरात मध्ये मध्यम पाऊस पडू शकतो. सक्रिय मान्सूनमुळे कोंकण व गोव्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. मुंबई मध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

पूर्व भारतात, काल बनलेला कमी दाबाचा पट्टा कामकुवत झाला आहे परंतु एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीवर विकसित झाली आहे ज्यामुळे ओडिशा आणि झारखंड मध्ये हलका ते मध्यम, पाऊस पडू शकतो. याउलट, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये हवामान कोरडे राहील. उत्तर पूर्व भारतात, नागालैंड, मणिपूर, असम आणि अरुणाचल प्रदेश मध्ये पावसाची शक्यता आहे. कोलकाता मध्ये हलका पाऊस पडू शकतो.

एक चक्रवाती परिस्थिती छत्तीसगढच्या मध्य भागांवर बनलेली आहे. एक आणखी परिस्थिती बंगालच्या खाडीच्या उत्तर भागांवर बनलेली आहे ज्यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. तथापि, तामिळनाडू, रायलसीमा, आणि केरळ मध्ये हवामान गरम आणि कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES