हवामान अंदाज 27 जुलै: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

July 26, 2019 8:05 PM | Skymet Weather Team


मान्सूनची अक्षीय रेषा पश्चिम राजस्थान पासून उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे. एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण पूर्व राजस्थान आणि लगतच्या पश्चिम मध्य प्रदेशवर बनलेली आहे. ज्यामुळे पूर्व आणि दक्षिण पूर्व राजस्थान, विदर्भ, छत्तीसगड, कोंकण व गोवा आणि दक्षिण गुजरात मध्ये हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. याशिवाय, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र मध्ये हलक्या पावसासह एक दोन मध्यम सरींची शक्यता आहे. दुसरीकडे, सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

एक कमी दाबाचा पट्टा गंगीय पश्चिम बंगाल आणि लगतच्या उत्तर ओडिशावर बनलेला आहे. ज्यामुळे दक्षिण ओडिशा मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर गंगीय पश्चिम बंगाल, असम आणि ओडिशाच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. याउलट, उर्वरित उत्तर पूर्व भारतात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

उत्तर मध्ये, पूर्व आणि दक्षिण पूर्व दिशेने उष्ण वारे वाहत आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थान मध्ये विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याउलट, उत्तर पश्चिम राजस्थान आणि लगतच्या दक्षिण पश्चिम पंजाबवर पावसाचा जोर कमी राहील.

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा कोंकण व गोव्या पासून कर्नाटक पर्येंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे केरळ आणि उत्तर आंध्र प्रदेश मध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. तेलंगाणा आणि हैदराबाद मध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस सुरु राहील. याउलट, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये हलका पाऊस पडू शकतो.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES