उत्तर भारतात, एक चक्रवाती परिस्थिती हरियाणा आणि जवळपास बनलेली आहे. मान्सूनची अक्षीय रेषा दक्षिण उत्तर प्रदेश, झारखंड, गंगीय पश्चिम बंगालला पार करून उत्तर बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे, पूर्व राजस्थान, दक्षिण हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. पंजाब, उर्वरित हरियाणा आणि उत्तर राजस्थान मध्ये विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती गंगीय पश्चिम बंगालवर बनलेली आहे ज्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, दक्षिण बिहार, असम, मेघालय, नागालैंड आणि मणिपूर मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ओडिशा आणि उर्वरित उत्तर पूर्व भारतात विखुरलेल्या हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
मध्य भारतात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये आता पावसाचा जोर वाढेल व येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच, कोंकण व गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण गुजरात मध्ये काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे.
दक्षिण भारतात, कर्नाटकच्या किनारीभागांवर मध्यम ते जोरदार पाऊस सुरु राहील. याशिवाय, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, रायलसीमा, आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक मध्ये पावसाचा जोर कमी राहील. केरळ, अंदमान व निकोबार द्वीपसमूह आणि लक्षद्वीप मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
Any information taken from here should be credited to skymetweather.com