Skymet weather

हवामान अंदाज 23 जुलै: मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस, दक्षिण कोंकणात जोरदार पावसाची शक्यता

July 22, 2019 6:59 PM |

केरळच्या उत्तर आणि मध्य भागांमध्ये पाऊस सुरु राहील. कारण आहे एक ट्रफ रेषा जी दक्षिण कोंकण व गोव्यापासून केरळ पर्येंत विस्तारलेली आहे. याशिवाय, पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय आहे. दक्षिण आंतरिक कर्नाटक मध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस सुरु राहील.

एक चक्रवाती परिस्थिती उत्तर कोंकण व गोवा आणि त्याच्या आसपास बनलेली आहे. एक उत्तर दक्षिण ट्रफ रेषा उत्तर मध्य प्रदेश पासून अंतर्गत कर्नाटक पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोंकणात मध्यम ते जोरदार पाऊस व मुंबईसह उत्तर कोंकणात आणि दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण पूर्व राजस्थान, छत्तीसगड आणि गुजरातच्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. विदर्भ आणि मराठवाड्यात एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.

एक चक्रवाती परिस्थिती बिहारवर बनलेली आहे ज्यामुळे बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश मध्ये हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम, असम, उत्तर पूर्व भारतात, झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये चांगला पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

एक चक्रवर्ती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे ज्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर मध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी गडगडाटी पावसाची अपेक्षा आहे. पश्चिम राजस्थान मध्ये हवामान मात्र कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try