एक ट्रफ रेषा उत्तर कर्नाटक पासून केरळ पर्येंत विस्तारलेली आहे. एक चक्रवाती परिस्थिती पूर्व मध्य अरबी समुद्रावर बनलेली आहे. ज्यामुळे, केरळ आणि कर्नाटक मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
एक आणखी चक्रवाती परिस्थिती पश्चिम मध्य बंगालच्या खाडीवर बनलेली आहे, ज्यामुळे तामिळनाडू मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा मध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. एक चक्रवाती परिस्थिती बंगालच्या खाडीवर बनलेली आहे ज्यामुळे अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
एक चक्रवाती परिस्थिती विदर्भ आणि दक्षिण पूर्व मध्य प्रदेशवर बनलेली आहे. मान्सूनची ट्रफ रेषा मध्य प्रदेशच्या उत्तर भागाला पार करून पुढे जात आहे. ज्यामुळे, दक्षिण मध्य प्रदेश मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड आणि विदर्भ मध्ये विखुरलेल्या मध्यम पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावर बनलेल्या चक्रवाती परिस्थिती आणि उष्ण वाऱ्यांमुळे, गुजरात मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. दक्षिण कोंकणात जोरदार पाऊस तर उत्तर कोंकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु राहील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
मान्सूनची ट्रफ रेषा ओडिशाच्या उत्तर भागाला पार करून पुढे जात आहे ज्यामुळे ओडिशाच्या दक्षिण भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय, तिब्बत क्षेत्रावर बनलेल्या पश्चिमी विक्षोभ आणि उष्ण वाऱ्यांमुळे सिक्कीम, उप हिमलायी पश्चिम बंगाल, असम आणि मेघालय मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर पूर्व राज्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.
एक कमकुवत पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये हवामान उष्ण आणि गरम राहील. मान्सूनची ट्रफ रेषा राजस्थानच्या उत्तर भागाला पार करून पुढे जात आहे ज्यामुळे राजस्थानच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
Any information taken from here should be credited to skymetweather.com