एक चक्रवाती परिस्थिती पंजाबवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पूर्व भारता पर्येंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे पंजाब मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, हरियाणा, पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेश मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये पावसाचा जोर कमी होईल व येथे मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय, जम्मू काश्मीर आणि दिल्ली मध्ये हलका पाऊस पडत राहील.
पूर्व भारतात, ट्रफ रेखा दक्षिण दिशेत वळली आहे ज्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये पावसाचा जोर कमी होईल. तथापि, उप हिमालयी पश्चिम बंगाल आणि असम मध्ये येणाऱ्या २४ तासांत, चांगल्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित उत्तर पूर्व भारतात, झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
दक्षिण मध्ये एक ट्रफ रेषा कर्नाटक पासून केरळ पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे कर्नाटक आणि केरळ मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तथापि, तेलंगाणा आणि रायलसीमा मध्ये हलका पाऊस पडेल. याशिवाय, आंध्र प्रदेश मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. लक्षद्वीप, अंदमान व निकोबार द्वीपसमूहवर मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.
मध्य भारतात मान्सून कमकुवत राहील. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागात हवामान कोरडे राहील. तथापि, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, दक्षिण छत्तीसगड, उत्तर कोंकण व गोआ मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोंकणात चांगला पाऊस पडत राहील.
Any information taken from here should be credited to skymetweather.com