हवामान अंदाज 13 जुलै: दक्षिण कोंकण व गोवा, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस

July 12, 2019 6:18 PM | Skymet Weather Team


एक कमी दाबाचा पट्टा उत्तर पूर्व उत्तर प्रदेशवर बनलेला आहे. एक ट्रफ रेषा उत्तर पंजाब पासून उत्तर पूर्व भारत पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये बऱ्याच ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, बिहार मध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. असम, मेघालय, अरूणाचल प्रदेश आणि उप हिमलायी पश्चिम बंगाल मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित उत्तर पूर्व भारतात, गंगीय पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा मध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतात, एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तान आणि लगतच्या पंजाबवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पंजाब आणि हरियाणाच्या आसपास विस्तारलेली आहे ज्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तर पंजाब व हरियाणा आणि उत्तराखंड मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याउलट, दक्षिण उत्तर प्रदेश, दक्षिण पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान मध्ये हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

मध्य भारतात, कोणतीही महत्वपूर्ण हवामान प्रणाली नाही बनलेली आहे ज्यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये हवामान कोरडे राहील. तथापि, दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भ मध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, दक्षिणी कोंकण व गोवा, मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या दक्षिण भागांवर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

एक ट्रफ रेषा कर्नाटक आणि केरळच्या आसपास विस्तारलेली आहे ज्यामुळे कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES