एक संघटित कमी दाबाचा पट्टा पूर्व उत्तर प्रदेशवर बनलेला आहे. एक ट्रफ रेषा नागालैंड पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्किम, असम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालैंड मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान उर्वरित पूर्वोत्तर भारत, झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तर भारतात, एक चक्रवाती परिस्थिती पाकिस्तानवर बनलेली आहे., एक ट्रफ रेषा उत्तर पूर्व भारता पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे. याशिवाय, जम्मू काश्मीर, उत्तर हरियाणा, पंजाब आणि दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याउलट, दक्षिण पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान मध्ये हवामान मात्र कोरडे राहील.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
मध्य भारतात, पश्चिम/दक्षिण पश्चिम दिशेने कोरडे वारे वाहत आहे ज्यामुळे दक्षिण पूर्व राजस्थान, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेश मध्ये हवामान कोरडे राहील. दरम्यान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. कोंकण व गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. मुंबई मध्ये आता पावसाचा जोर कमी होण्याची अपेक्षा आहे.
दक्षिण मध्ये, एक ट्रफ रेषा दक्षिण कोंकण पासून उत्तर केरळ पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे कर्नाटक मध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो. दरम्यान, केरळ, तेलंगाणा, आंतरिक कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये हवामान मात्र कोरडे राहील.
Any information taken from here should be credited to skymetweather.com