ओडिशावर बनलेला डीप डिप्रेशन दक्षिण ओडिशा मध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस देईल. उर्वरित भागात, तसेच गंगीय पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम, असम आणि अरुणाचल प्रदेश मध्ये मध्यम पाऊस पडू शकतो. उर्वरित उत्तर पूर्व भारतात, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश मध्ये विखुरलेला हलका पाऊस पडू शकतो.
मध्य भारतात, एक ट्रफ रेषा दक्षिण पूर्व राजस्थान पासून डीप डिप्रेशन पर्येंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण मध्य प्रदेश मध्ये मान्सूनची स्थिती जोरदार राहील. शिवाय, विदर्भ, मराठवाडा, कोंकण व गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्र, उर्वरित मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दक्षिण पूर्व राजस्थान मध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. गुजरात मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
दक्षिण मध्ये, एक ट्रफ रेषा दक्षिण गुजरात पासून उत्तर केरळ पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे कर्नाटक, केरळ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. तथापि, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता आहे. तेलंगाणा, लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे.
उत्तर मध्ये, उत्तर राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा मध्ये पाऊस पडेल. पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्मीर मध्ये हलका पाऊस पडू शकतो.
Any information taken from here should be credited to skymetweather.com