हवामान अंदाज 6 ऑगस्ट: मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्यात आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस

August 5, 2019 6:27 PM | Skymet Weather Team

एक कमी दाबाचा पट्टा उत्तर ओदिशावर बनला आहे ज्यामुळे ओडिशा मध्ये मध्यम ते जोरदार पावसासह एक दोन मुसळधार सरींची शक्यता आहे. झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. बिहार, उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि उत्तर पूर्व भारतात विखुरलेल्या हलका पावसाची शक्यता आहे. तथापि, पूर्व उत्तर प्रदेश मध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि पूर्व राजस्थान पासून विस्तारलेल्या ट्रफ रेषेमुळे छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेश मध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. शिवाय, गुजरात, मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्यात, उर्वरित मध्य प्रदेश आणि विदर्भातील भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. दक्षिण कोंकण व गोव्यात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

उत्तर मध्ये, एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तान आणि लगतच्या पंजाबवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा दक्षिण हरियाणापर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये मध्यम पाऊस, तर जमु काश्मीर मध्ये विखुरलेल्या पावसाची अपेक्षा आहे.

दक्षिण मध्ये, केर्ळवार मान्सूनचा प्रभाव वाढेल व येथे मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES