Skymet weather

हवामान अंदाज 5 ऑगस्ट: कोंकण क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई मध्ये पाऊस कमी होईल

August 4, 2019 7:56 PM |

मध्य भारतात, एक ट्रफ रेषा गुजरात पासून केरळपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे गोवा आणि कोंकण क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई मध्ये आता पाऊस कमी होईल. राहिलेला भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. एक आणखी ट्रफ रेषा गुजरात पासून उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे. मान्सूनची अक्षीय रेषा उत्तर मध्य प्रदेशच्या जवळ विस्तारलेली आहे ज्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. वडोदरासह गुजरात मध्ये मध्यम पाऊस सुरु राहील. सौराष्ट्र मध्ये हलका पाऊस पडेल.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात एक चक्रवाती परिस्थिती उत्तर बंगालच्या खाडीत बनलेली आहे. हि प्रणाली अजून प्रभावी होईल ज्यामुळे ओडिशा, झारखंड आणि गंगीय पश्चिम बंगाल मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. बिहार मध्ये पावसाचा जोर वाढेल. उत्तर पूर्व भारतात हवामान उष्ण आणि गरम राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तर भारतात, एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये बनलेली आहे. मान्सूनची अक्षीय रेखा उत्तर दिशेत वळेल ज्यामुळे उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा मध्ये पावसाचा जोर वाढेल. एक कमकुवत पश्चिमी विक्षोभ उत्तर पूर्व जम्मू काश्मीरवर बनलेला आहे, ज्यामुळे उत्तराखंड मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हिमाचल आणि पंजाब मधेही हलक्या पावसाची शक्यता आहे.

दक्षिण भारतात, ट्रफ रेषेमुळे कर्नाटक आणि केरळ मध्ये पाऊस वाढेल. तामिळनाडू मध्ये हवामान मात्र कोरडे राहील. तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try