हवामान अंदाज 31 ऑगस्ट: नागपूर आणि रत्नागिरी मध्ये मध्यम पाऊस, मुंबईत मध्यम सरींची शक्यत

August 30, 2019 6:21 PM | Skymet Weather Team

एक चक्रवाती परिस्थिती छत्तीसगढ़वर बनलेली आहे. मान्सूनची अक्षीय रेषा उत्तर पश्चिम राजस्थान पासून उत्तर पूर्व बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे मध्य प्रदेश, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड, पूर्व राजस्थान, गुजरात आणि कोंकण व गोव्यातील भागांत मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. मुंबई मध्ये मध्यम सरींची शक्यता आहे.

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. नागपूर आणि रत्नागिरी मध्ये मध्यम पावसासह काही जोरदार सरींची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

पूर्व मध्ये, पाऊस कमी होईल. तथापि, ओडिशा मध्ये काही चांगल्या सरींची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड तसेच पूर्वोत्तर भारतात मान्सून कमकुवत राहील. कोलकाता मध्ये हवामान कोरडे राहील. तथापि, आसाम, नागालैंड, उप हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये एक दोन मध्यम सरींची शक्यता आहे.उत्तर पश्चिम भारतात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस सुरु होईल.

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. दक्षिण मध्ये, रायलसीमा, तामिळनाडू आणि अंतर्गत कर्नाटक मध्ये मान्सून कमकुवत राहील. तेलंगाणा, उत्तर आंध्र प्रदेश आणि केरळ मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. कर्नाटक मध्ये एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES