मध्य भारतात, एक कमी दाबाचा पट्टा उत्तर छत्तीसगड आणि लगतच्या झारखंड आणि ओडिशावर बनलेला आहे. मान्सूनची अक्षीय रेषा उत्तर पश्चिम राजस्थान पासून उत्तर पूर्व बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे.ज्यामुळे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश तसेच विदर्भात पाऊस वाढेल व येथे मध्यम पाऊस पडेल. एक दोन जोरदार सरींची देखील शक्यता आहे. दक्षिण पूर्व राजस्थान, गुजरात आणि कोंकण व गोव्यात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल. मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून कमकुवत राहील. मुंबई मध्ये एक दोन मध्य सरींसह हलका पाऊस पडू शकतो.
पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, ओडिशा, झारखंड, उप हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडेल. गंगीय पश्चिम बंगाल मध्ये मान्सून कमकुवत राहील. तथापि एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो. आसाम, मेघालय आणि नागालैंड मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. कोलकाता मध्ये हवामान कोरडे राहील.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
दक्षिण मध्ये, केरळ आणि कर्नाटक मध्ये पाऊस कमी होईल. याउलट, उत्तर आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा मध्ये पाऊस सुरु राहील. मान्सून अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर सक्रिय राहील. येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये काही मध्यम सरींची शक्यता आहे. पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा मध्ये मेघगर्जना होऊ शकते.
Any information taken from here should be credited to skymetweather.com