Skymet weather

हवामान अंदाज 3 ऑगस्ट: मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ मध्ये मध्यम पावसाची शक्यता

August 2, 2019 7:03 PM |

सध्या एक ट्रफ रेषा पूर्व राजस्थान पासून मराठवाड्या पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे पूर्व आणि दक्षिण पूर्व राजस्थान आणि गुजरातच्या भागात मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील पश्चिम भागात, कोंकण आणि गोवा, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या विदर्भ मध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. मुंबई मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु राहील. एक दोन जोरदार सरींचीही अपेक्षा आहे. याउलट, पूर्व उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये पावसाचा जोर कमी राहील.

उत्तर भारतात, मान्सूनची अक्षीय रेखा उत्तर पश्चिम राजस्थान पासून मिझोराम पर्येंत विस्तारलेली आहे. एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण मध्य उत्तर प्रदेशवर बनलेली आहे ज्यामुळे उत्तर राजस्थान, दिल्ली, हरियाणा, आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची अपेक्षा आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती असम मध्ये बनलेली आहे. मान्सूनची अक्षीय रेखा दक्षिण बिहार आणि झारखंड ला पार करून पुढे जात आहे ज्यामुळे झारखंड आणि दक्षिण बिहार मध्ये मध्यम पाऊस पडू शकतो. ओडिशा, उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम, असम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश मध्ये विखुरलेला मध्यम पाऊस पडू शकतो. याउलट, मान्सून गंगीय पश्चिम बंगाल आणि उर्वरित उत्तर पूर्व भारतात कमकुवत राहील.

दक्षिण मध्ये कोणतीही महत्वपूर्ण हवामान प्रणाली नाही बनलेली आहे ज्यामुळे तामिळनाडू, केरळ, अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा आणि तेलंगणाच्या दक्षिण भागात मान्सून कमकुवत राहील. उत्तर तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try