हवामान अंदाज 28 ऑगस्ट: महाराष्ट्रात पाऊस कमी होणार, दक्षिण कोंकणात मध्यम पाऊस सुरु राहणार

August 27, 2019 7:33 PM | Skymet Weather Team

मॉन्सूनची ट्रफ रेषा दक्षिणेकडे सरकली आहे आणि गुजरात, दक्षिणपूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशला पार करून पुढे जात आहे. चक्रवाती परिस्थिती कच्छ क्षेत्रात विकसित झाली आहे. म्हणूनच, गुजरात, दक्षिणपूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांत हलक्या ते मध्यम पावसासह काही मुसळधार सरींची शक्यता आहे. विखुरलेला हलका पाऊस उर्वरित मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होऊ शकतो. तसेच, महाराष्ट्रात आता पावसाचा जोर कमी होईल, परंतु दक्षिण कोकण आणि गोवा येथे मध्यम पाऊस सुरु राहील.

देशाच्या पूर्व भागात, चक्रवाती परिस्थिती उत्तर ओडिशा आणि लगतच्या पश्चिम बंगालवर उपस्थित आहे. झारखंडच्या दक्षिण जिल्ह्यांसह ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगालमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तर पूर्व भारत मान्सूनचा पाऊस सुरु राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

कर्नाटक आणि केरळमध्ये मॉन्सूनची लाट अजूनही कमी आहे. त्यामुळे केरळ आणि कर्नाटक मध्ये एक किंवा दोन जोरदार सरींसह मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. उर्वरित दक्षिण द्वीपकल्पात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. तर अंदमान आणि निकोबारसह लक्षद्वीप द्वीपसमूहावर एक किंवा दोन जोरदार सरींची शक्यता आहे.

उत्तर भारतावर मान्सून कमकुवत राहील. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागात एक किंवा दोन मध्यम सरींसह हलका पाऊस संभव आहे. तर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES