एक चक्रवाती परिस्थिती उत्तर मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपास बनलेली आहे. मान्सूनची अक्षीय रेषा उत्तर पश्चिम राजस्थान पासून उत्तर बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे उत्तर आणि पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात आणि उत्तर छत्तीसगड मध्ये हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. कोंकण आणि गोवा मध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरु राहील. विदर्भात, दक्षिण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या दक्षिण भागांत एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई मध्ये हलका पाऊस सुरु राहील.
पूर्व भारतात, पावसाचा जोर कमी होईल. गंगीय पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड मध्ये विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण बिहार मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडेल. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालैंड मध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
दक्षिण मध्ये, केरळ आणि कर्नाटक मध्ये मान्सून सक्रिय राहील. ज्यामुळे येथे मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच, अंतर्गत तामिळनाडू आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक मध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु राहील. आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये कोरड्या हवामानासह एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो.
उत्तर मध्ये, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थान मध्ये हवामान जवळ जवळ कोरडे राहील. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल.
Any information taken from here should be credited to skymetweather.com