हवामान अंदाज 24 ऑगस्ट: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस, मुंबईत हलका पाऊस

August 23, 2019 7:42 PM | Skymet Weather Team

एक चक्रवाती परिस्थिती उत्तर मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपास बनलेली आहे. एक ट्रफ रेषा छत्तीसगड पासून उत्तर पूर्व बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये मध्यम पावसासह एक दोन मुसळधार सरींची शक्यता आहे. दक्षिण कोंकण व गोव्यात आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडेल तर उत्तर कोंकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात मध्ये हलका पाऊस पडू शकतो. मुंबई मध्ये हलका पाऊस सुरु राहील.

पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश मध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस सुरु राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

दक्षिण भारतात, केरळ आणि कर्नाटक मध्ये चांगला पाऊस सुरु राहील. आंध्र प्रदेश, तेलंगाणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक मध्ये विखुरलेला पाऊस पडेल. तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये पावसाचा जोर कमी राहील. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. चेन्नई मध्ये हवामान कोरडे राहील.

उत्तर भारतात, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश मध्ये मध्यम सरींची शक्यता आहे तर जम्मू काश्मीर मध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल तर पंजाब, हरियाणा आणि दिल्ली मध्ये गडगडाटीसह हलक्या सरींची अपेक्षा आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES