Skymet weather

हवामान अंदाज 2 ऑगस्ट: विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस कमी होणार, मुंबई मध्ये पाऊस सुरूच

August 1, 2019 6:43 PM |

मध्य भारत, मान्सूनची अक्षीय रेषा उत्तर पश्चिम राजस्थान पासून पूर्वोत्तर भारतापर्येंत विस्तारलेली आहे. एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण पूर्व उत्तर प्रदेशवर बनलेली आहे ज्यामुळे उत्तर आणि पूर्व राजस्थान मध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड मध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आता पावसाचा जोर कमी होईल. तथापि, गुजरात आणि कोंकण व गोव्यावर मध्यम ते जोरदार पाऊस सुरु राहील. मुंबई मध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये मध्यम पाऊस सुरु राहील. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. तापमानात देखील घट दिसून येईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

पूर्व भारतात, मान्सूनची ट्रफ रेषा पूर्व दिशेत सरकली आहे ज्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, सिक्कीम, असम आणि मेघालय मध्ये चांगला पाऊस पाडेल. याशिवाय, उप हिमालयी पश्चिमी बंगाल, सिक्कीम, असम आणि मेघालय मध्ये चांगला पाऊस सुरु राहील.

दक्षिण मध्ये, कर्नाटक मध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. आंध्र प्रदेश मध्ये पाऊस सुरु राहील. तेलंगणा मध्ये आता पाऊस कमी होईल. तामिळनाडू आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक मध्ये हवामान जवळपास कोरडे राहील. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try