छत्तीसगड आणि आसपासच्या भागात कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे. मान्सूनची अक्षीय रेषा पंजाब पासून उत्तर बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेश आणि दक्षिण छत्तीसगड मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात विखुरलेला पाऊस पडू शकतो.
बेतूल, खरगोण, खांडवा, अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. कोंकण व गोव्यात परत पाऊस वाढेल. मुंबई मध्ये मध्यम सरींची शक्यता आहे.
पूर्व भारतात, ओडिशा आणि झारखंड मध्ये हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. गंगीय पश्चिम बंगाल मध्ये
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस सुरु राहील. उत्तर पूर्व भारतात पावसाचा जोर वाढेल आणि येथे मध्यम सरींची शक्यता आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो.
उत्तर भारतात, मान्सूनची अक्षीय रेषा उत्तर दिशेत सरकली आहे ज्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये मान्सूनचा पाऊस वाढेल व येथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये मध्यम पावसासह 1-2 जोरदार सरींची शक्यता आहे. जम्मू काश्मीर मध्ये विखुरलेला पाऊस पडू शकतो.
दक्षिण मध्ये, केरळ मध्ये अजूनही मान्सूनची लाट कायम आहे ज्यामुळे मध्यम ते जोरदार पाऊस सुरु राहील. कर्नाटक मध्ये पावसाचा जोर कमी होईल. उत्तर आंध्र प्रदेश आणि उत्तर तेलंगणा मध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. तथापि, उर्वरित आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंतर्गत कर्नाटक मध्ये मान्सून कमकुवत राहील.
Any information taken from here should be credited to skymetweather.com