Skymet weather

हवामान अंदाज 10 ऑगस्ट: महाराष्ट्रात पाऊस कमी होणार, मुंबई मध्ये हलका पाऊस

August 9, 2019 6:41 PM |

कमी दाबाचा पट्टा दक्षिण पाकिस्तान आणि लगतच्या कच्छ क्षेत्रावर आहे ज्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच, गुजरात क्षेत्र आणि उत्तर कोंकण व गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल. दक्षिण कोंकण व गोव्यात मध्यम सरींची शक्यता आहे. संपूर्ण मध्य प्रदेश आणि अंतर्गत महाराष्ट्रात आता पावसाचा जोर कमी होईल व येथे विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसासह बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहील. मुंबई मधेही हलका पाऊस पडेल. एक दोन मध्यम सरींची शक्यता नाकारता येणार नाही.

दक्षिण मध्ये, कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर एक कमकुवत ट्रफ रेषा उपस्थित आहे ज्यामुळे कर्नाटक आणि केरळ मध्ये मध्यम पावसासह काही मुसळधार सरींची शक्यता आहे. अंतर्गत कर्नाटक, तमेळनाडू आणि लगतच्या केरळ मध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर मध्यम ते जोरदार पाऊस सुरु राहील. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहील, उत्तर तेलंगणा मध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तर पूर्व भारतात, उप हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पूर्व बिहार, झारखंड आणि गंगीय पश्चिम बंगाल मध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. ओडिशा मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडेल. पूर्व उत्तर प्रदेश मध्ये हवामान कोरडे राहील.

उत्तर मध्ये, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन मुसळधार सरींची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये विखुरलेला हलका पाऊस सुरु राहील. याउलट, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर राजस्थान मध्ये हवामान कोरडे होईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try