पूर्व आणि ईशान्य भारतापासून सुरुवात करूया, चक्रवाती परिस्थिती पूर्व उत्तर प्रदेशवर आहे. आता पूर्व भारतात पाऊस कमी होईल परंतु पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये आणखी काही काळ सुरूच राहील. २३ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरापर्यंत पूर्व बिहार, पूर्व झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. आसाममध्ये हलका पाऊस पडेल.
कॉन्फ्लुएन्स झोन पूर्व मध्य प्रदेशात आहे. त्यामुळे ईशान्य मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडमध्ये विखुरलेला पाऊस पडेल. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरापासून दमदार वाऱ्यांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये किमान तापमानात आणखी वाढ होईल. दरम्यान, पश्चिम राजस्थानमधील किमान तापमानात किरकोळ घसरण होऊ शकते.
Click the image below to see the live lightning and thunderstorm across India
दक्षिण भारतात, तमिळनाडूच्या दक्षिणेकडील भागांवर एक ट्रफ रेषा आहे. त्यामुळे दक्षिण तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आंतरिक व उत्तर-किनारपट्टी भागांमध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. चेन्नईमध्येही हलका पाऊस होऊ शकतो. कर्नाटक, केरळ आणि तेलंगाणासह दक्षिण भारतातील उर्वरित भाग कोरडे राहतील.
शेवटी उत्तर भारतात, आता पश्चिमी विक्षोभ दूर जात आहे. पश्चिमी विक्षोभाच्या अवशेषसामुळे उत्तराखंड आणि पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेशच्या काही भागात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. दरम्यान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थान तसेच दिल्लीचे किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घसरण होऊ शकते.
Any information taken from here should be credited to skymetweather.com