Skymet weather

हवामान अंदाज 17 फेब्रुवारी: मुंबईसह महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणे अपेक्षित

February 16, 2020 6:14 PM |

उत्तर भारतापासून सुरुवात करूया, पश्चिमी विक्षोभ आता दूर जात आहे. यामुळे लडाखवर हलका पाऊस पडेल. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे कोरडे हवामान राहील. पहाटे धुके असण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीतील हवेची गुणवत्ता खराब राहील.

मध्य भारतात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये हवामान कोरडे राहील. या ठिकाणी संध्याकाळी धुके असण्याची शक्यता आहे. मुंबईत कोरडे व उबदार हवामान राहील.पूर्व आणि ईशान्य भारतात, कोणतीही महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली नसताना बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. ओडिशातील काही उत्तर भाग जसे अंगुल आणि केनझरगडमध्ये शीतलहरीसारखी परिस्थिती दिसून येईल. दरम्यान, बांगलादेशात चक्रवाती परिस्थिती आहे यामुळे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम आणि नागालैंडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा आहे. तसेच, बंगालच्या उपसागरामध्ये एक अँटी-सायक्लोनिक सर्कुलेशन कायम आहे. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि तामिळनाडूमध्ये जोरदार वारे वाहतील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try