Skymet weather

हवामान अंदाज 30 डिसेंबर: नागपूर, यवतमाळ आणि परभणी येथे पावसाची शक्यता

December 29, 2019 6:58 PM |

उत्तर / उत्तर-पश्चिमोत्तर थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतात शीतलहरींची स्थिती कायम राहील. दक्षिण पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिणपूर्व राजस्थानमध्ये चक्रवाती परिस्थिती आहे. राजस्थानात वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे शीतलहरीच्या स्थिती पासून आराम मिळेल. दिल्ली प्रदूषण खराब ते अगदी खराब श्रेणीत असेल.

उत्तर-पश्चिमी थंड वाऱ्यांमुळे उत्तर मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडमध्ये शीतलहरीची परिस्थिती कायम राहील. धुक्याची देखील शक्यता आहे. दक्षिणपूर्व गुजरातमध्ये खालच्या पातळीवर चक्रवाती परिस्थिती आहे. त्यामुळे गुजरातमध्ये ढगाळ व आरामदायक वातावरण राहील. अमरेली, वेरावळ, पोरबंदर आणि सुरत येथे हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्याच प्रणालीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, यवतमाळ आणि परभणी येथे पाऊस पडू शकतो. मुंबईतील हवामान कोरडे राहील. दिवस थोडा उबदार होईल त्यानंतर रात्री हवामान सुखद राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

पूर्व आणि ईशान्य भारतात, कोरडे हवामान कायम राहील. बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये उत्तर पश्चिम थंड वारा असल्यामुळे मध्यम ते दाट धुक्याची शक्यता आहे. बिहार आणि लगतच्या उप हिमालयीन पश्चिम बंगालच्या भागात शीतलहरीची स्थिती कायम राहील.

दक्षिणेकडे, एक ट्रफ रेषा केरळ किनारपट्टीवर विस्तारित आहे. शिवाय, बंगालच्या उपसागरापासून उत्तरेकडील आर्द्र वाऱ्यांमुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा यापैकी एक-दोन भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हैदराबाद शहराच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try