Skymet weather

हवामान अंदाज 24 डिसेंबर: मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता

December 23, 2019 5:26 PM |

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा दक्षिणपूर्व अरबी समुद्रापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत विस्तारित आहे आणि तामिळनाडू किनाऱ्यावर ईशान्य वाऱ्यांनी वेग वाढविला आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात पाऊस वाढेल. या भागांमध्ये एक किंवा दोन मध्यम सरींसह हलका पाऊस होईल. लक्षद्वीपमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तथापि, तेलंगाणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे हवामान कोरडे राहील.

दरम्यान, मध्य भारतात, विपरीत चक्रवाती परिस्थिती ओडिशावर आहे आणि या प्रणालीमुळे दक्षिण-पूर्वेकडून आर्द्र वारे विदर्भ आणि मध्य प्रदेशात वाहत आहेत आणि ते कोरडे व थंड उत्तर पश्चिम दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमध्ये विलीन होत आहेत. या संगममुळे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य प्रदेशातील काही भागात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, गुजरात आणि दक्षिण राजस्थानचे हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तरेकडील, उत्तर पश्चिम दिशेने थंड वारे देशाच्या मैदानावर सुरूच राहतील. पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे धुक्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या उत्तर भागांमध्ये पाऊस व बर्फवृष्टी होईल. दिल्ली प्रदूषण खराब ते अगदी खराब श्रेणीत राहील.

शेवटी, आपल्या देशातील पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली नाही आहे. त्रिपुरा मेघालयच्या एक दोन ठिकाणी धुके असण्याची शक्यता आहे. झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे सकाळच्या वेळी धुके दिसू शकतात. कोलकाता, रांची, पटना आणि गुवाहाटी येथे हवामान कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try