Skymet weather

हवामान अंदाज 23 डिसेंबर: मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागात पावसाची शक्यता

December 22, 2019 6:53 PM |

उत्तर भारतापासून सुरुवात करूया, पश्चिमी विक्षोभ लडाखच्या पूर्वेकडील भागांवर आहे. त्याचे प्रेरित चक्रवाती परिस्थिती हरियाणाच्या उत्तर भागांवर आहे. या प्रणालींमुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उत्तर भागांत पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. राजस्थानच्या पूर्वेकडील भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील उर्वरित भागांमध्ये सकाळच्या वेळी धुके असण्याची शक्यता आहे. दिल्लीत थंडी वाढेल व धुके पाहायला मिळेल. येथे, जोरदार वाऱ्यांमुळे प्रदूषणात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

मध्य भारताबद्दल बोलायचे तर, चक्रवाती परिस्थिती गुजरातच्या ईशान्य भागात आहे. एक ट्रफ रेषा पूर्व मध्य अरबी समुद्रापासून पूर्व राजस्थानपर्यंत विस्तारित आहे. या प्रणालींमुळे पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

पूर्वेकडील आणि ईशान्य भारतात, कोरड्या वाऱ्यांमुळे बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये धुके असण्याची शक्यता आहे. तसेच आसामच्या पूर्वेकडील भागात चक्रवाती परिस्थिती आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशात एक दोन ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. ईशान्य राज्यातील इतर भाग कोरडे राहण्याची शक्यता आहे.

शेवटी दक्षिण भारतात, तमिळनाडू किनाऱ्यापासून एक ट्रफ विस्तारित आहे. यामुळे तामिळनाडूमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळमध्येही हलका पाऊस पडेल. तसेच दक्षिणेकडील लक्षद्वीप आणि लगतच्या हिंद महासागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ज्यामुळे लक्षद्वीप समूहावर मध्यम पावसाची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try