Skymet weather

हवामान अंदाज 18 डिसेंबर: उत्तर पश्चिम भारतात धुक्याची शक्यता, विदर्भात तापमान कमी होणार

December 17, 2019 6:18 PM |

18 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत पश्चिमी विक्षोभ पश्चिम हिमालयाजवळ पोहोचेल. वरच्या भागांत काही ठिकाणी हलक्या हिमवृष्टीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील उर्वरित भागांत हळूहळू पाऊस वाढेल. मैदानावर, 18 डिसेंबरच्या संध्याकाळपासून ढग हळूहळू वाढतील आणि थंडी कमी होईल.धुक्याची तीव्रता कमी होईल. तथापि, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान आणि उत्तर हरियाणामध्येही एक दोन ठिकाणी धुके असण्याची शक्यता आहे. दिल्लीत मध्यम धुक्याची शक्यता आहे, किमान तापमानात किंचित घट दिसून येईल तर कमाल तापमानात वाढ होईल.

मध्य प्रदेशात आणि लगतच्या छत्तीसगडमध्ये हलक्या ते मध्यम धुक्याची शक्यता आहे. हवामान कोरडे राहील आणि सकाळच्या तापमानात विदर्भासह मध्य भारतातील उर्वरित भागांत काही अंशांची घट दिसून येईल. मुंबईत हवामान आरामदायक राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

पूर्व आणि ईशान्य भागात, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि नागालैंडच्या काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतामध्ये पहाटे धुके असण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात बऱ्याच ठिकाणी मध्यम प्रमाणात धुके असण्याची शक्यता आहे.

दक्षिणेस, दक्षिण -आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये ईशान्य वारे सुरू राहतील. हलक्या पावसासह काही भागांत मध्यम सरींची शक्यता आहे. तेलंगाणा आणि उत्तर कर्नाटकात कोरडे हवामान पाहायला मिळेल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try