हवामान अंदाज 12 डिसेंबर: विदर्भात पावसाची शक्यात, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी

December 11, 2019 7:48 PM | Skymet Weather Team

वेस्टर्न डिस्टर्न्स जम्मू-काश्मीरवर आहे आणि त्याचे प्रेरित चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तान आणि लगतच्या उत्तर पश्चिम राजस्थानमध्ये आहे. या परिस्थितीपासून एक ट्रफ पूर्व उत्तर प्रदेशापर्यंत विस्तारित आहे.जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख आणि उत्तराखंडमध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या उत्तरेकडील भागात एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही १२ डिसेंबरच्या दुपारपासून हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाची शक्यता आहे.

आपल्या देशाच्या मध्य भागात, उत्तर-दक्षिण ट्रफ रेषा प्रेरित चक्रवाती परिस्थिती पासून दक्षिण राजस्थान पर्यंत विस्तारित आहे. त्यामुळे राजस्थानच्या बऱ्याच भागात आणि मध्य प्रदेशात एक दोन ठिकाणी गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर छत्तीसगड आणि विदर्भातील एक दोन ठिकाणी हलक्या सरी बरसतील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

आपल्या देशाच्या पूर्वेकडील भागात, ज्यात पूर्व - उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा व पश्चिम बंगाल हवामान कोरडे राहील. अरुणाचल प्रदेशात एक दोन ठिकाणी पाऊस पडेल. उर्वरित ईशान्य भारतातील हवामान कोरडे राहील.

अखेरीस, दक्षिण भारतात, तेलंगाणात कॉन्फ्लुएन्स झोन आहे, म्हणून तेलंगणात एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह व तामिळनाडूच्या काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकचे हवामान जवळपास कोरडे होईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES