हवामान अंदाज 11 डिसेंबर: काश्मीर मध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी, महाराष्ट्रात हवामान कोरडेच

December 10, 2019 8:44 PM | Skymet Weather Team

वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू-काश्मीरवर आहे आणि त्याचे प्रेरित चक्रवाती परिस्थिती पश्चिम राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या पाकीस्तानावर आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काही भागात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फबवृष्टीची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस आणि हिमवादळ दिसून येईल. उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामधील हवामान ढगाळ असेल परंतु पावसाची शक्यता कमीच आहे. दिल्ली आणि एनसीआर मध्ये प्रदूषण खराब ते अगदी खराब श्रेणीत असेल. उत्तर पश्चिम मैदानावरील किमान तापमानात दोन अंशांनी वाढ होऊ शकते.

दरम्यान, मध्य भारतात राजस्थानच्या पश्चिम आणि उत्तर भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये हवामान कोरडे राहील. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत किमान तापमानात वाढ दिसून येईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

पूर्व आणि ईशान्य भारतात, मेघालय आणि लगतच्या पूर्व बांगलादेशात चक्रवाती परिस्थिती आहे. सिक्कीम, मेघालय, आसाम आणि नागालैंडच्या एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अरुणाचल प्रदेशातही हलका पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. ओडिशावर विपरीत चक्रवाती परिस्थिती आहे ज्यामुळे पूर्वेकडील राज्यांचे हवामान कोरडे राहील.

दक्षिण भारतात, एक ट्रफ दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रापासून तामिळनाडू किनाऱ्यापर्येंत विस्तारित आहे. आम्ही किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची अपेक्षा करतो. तेलंगाणा आणि केरळचे हवामान कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES