[Marathi] 6 सप्टेंबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: महाराष्ट्रात गणपती विसर्जनादरम्यान आल्हाददायक हवामान

September 5, 2017 6:32 PM | Skymet Weather Team


 

यावर्षी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत गणेशोत्सवाची सुरुवात पावसाने झालेली होती. वास्तविक, सुरुवातीपासून मुंबईसह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरूच होती, व गणेशोत्सवादरम्यान मुंबईत प्रचंड मुसळधार पावसामुळे पूर सदृश परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. तथापि, उत्सवाच्या शेवटच्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतल्याने आधी झालेल्या जोरदार पावसाची तमा न बाळगता मुंबईकरांनी गणेशोत्सवचा आनंद घेतला.

तसेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान प्रामुख्याने आल्हाददायक झालेले असल्यामुळे आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांचा उत्साह नक्कीच द्विगुणीत झालेला आहे असे म्हणणे वावगे होणार नाही.

[yuzo_related]

स्काइमेटच्या अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान जवळजवळ कोरडे राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने पुणे, परभणी, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यांत दिवसभर हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

तसेच, तापमान ३० अंशाच्या खाली राहील असे अपेक्षित आहे. दरम्यान अकोला आणि चंद्रपूर येथे मात्र हवामान थोडेसे गरम राहण्याची शक्यता आहे मात्र असे असले तरी एकंदरीत हवामान आरामदायक राहण्याची शक्यता आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES