Skymet weather

[Marathi] 21 सप्टेंबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार

September 20, 2017 4:30 PM |


 

स्कायमेटने वर्तवल्यानुसार गेल्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तथापि, किनारपट्टीतील भागांच्या तुलनेने राज्याच्या अंतर्गत भागात मात्र कमी पावसाची नोंद झालेली आहे.

दरम्यान, पुढील २४ तासात राज्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून, तुरळक भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

[yuzo_related]

वास्तविक, मुंबईसह उत्तर कोकणात देखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्टात मात्र हलक्या सरींची शक्यता आहे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

पुढील २४ तासांत नाशिक, पुणे, डहाणू, सांगली, सातारा, हर्णे, महाबळेश्वर, कोल्हापूर, जळगाव आणि रत्नागिरी या सारख्या शहरांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता असून, नंतर मात्र विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी होणे अपेक्षित आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try