गेल्या २४ तासात, कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून सक्रीय असल्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. हर्णे येथे तब्बल ३७४ मिमी. पावसाची नोंद झालेली असून, महाबळेश्र्वर येथे ११६ मिमी., वेंगुर्ला येथे ११३ मिमी. आणि रत्नागिरी मध्ये देखील ९५ मिमी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
पुढील 24 तासांत, राज्यातील कोकण किनारपट्टी व लगतच्या भागात मध्यम ते जोरदार सरी होण्याची शक्यता असून, हर्णे, पुणे, रत्नागिरी, मुंबई, वेंगुर्ला आणि महाबळेश्वर याठिकाणी देखील उद्या चांगला पाऊस अपेक्षित आहे.
[yuzo_related]
दरम्यान नाशिक, सातारा, सांगली आणि अहमदनगर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होवू शकतो.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com