[Marathi] 16 सप्टेंबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: पुणे, मुंबई, नाशिकमध्ये चांगला पाऊस; लातूर, कोल्हापूरात जोर ओसरणार

September 15, 2017 5:30 PM | Skymet Weather Team


 

गेल्या २४ तासात, महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आलेली असून, राज्याच्या किनारपट्टीवरील भागांमध्ये मान्सून सक्रीय असल्यामुळे मुसळधार पाऊस झालेला आहे. प्रामुख्याने हर्णेमध्ये ८० मिमी, मुंबईत ६४ मिमी, भिरा येथे ५९ आणि अलिबागमध्ये ५८ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

सद्य स्थितीला असलेल्या दोन चक्रवाती प्रणालींपैकी,एक प्रणाली अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीच्या जवळ असून दुसरी आग्नेय राजस्थानात व लगतच्या मध्यप्रदेशावर आहे. या दुसऱ्या प्रणाली पासून तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गुजरात मधून अरबी समुद्रापर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे राज्यात सध्याचा चांगला पाऊस होतो आहे.

[yuzo_related]

पुढील २४ तासांत, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तसेच किनारपट्टी लगतच्या भागात एक किंवा दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होवू शकतो. प्रामुख्याने पुणे, मुंबई, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अलिबाग, रत्नागिरी, महाबळेश्वर, हर्णे आणि भिरा यासारख्या ठिकाणी उद्या चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागपूर, लातूर, नांदेड, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे तुरळक सरी होवू शकतात.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES