गेल्या ४८ तासांत राज्यात विशेषत: विदर्भ क्षेत्रामध्ये तसेच औरंगाबाद, जेऊर, कोल्हापूर, जालना आणि नाशिक या शहरांमध्ये चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
तथापि, पुढील १ ते २ दिवसात कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
[yuzo_related]
मात्र पुढील २४ ते ४८ तासांत विदर्भात चांगला पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भातीलअकोला, नागपूर, बुलढाणा, आणि मराठवाड्यातील औरंगाबाद व बीड येथे मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने सोलापूर, जळगाव, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत एक-दोन हलक्या सरींची शक्यता आहे.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
असे असले तरी मुंबईसह कोकण आणि गोवा विभागात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com