बऱ्याच दिवसा पासून, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वातावरण कोरडे व उबदार आहे, मात्र गेल्या 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे.
राज्यावर असलेल्या अनेक हवामान प्रणालीच्या प्रभावा मुळे पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रतील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी येत्या २४ तासात एक किंवा दोन जोरदार सरी होण्याची शक्यता आहे.
[yuzo_related]
स्कायमेटच्या अंदाजानुसार, उत्तर कोकणात पुढील २४ तासांनंतर हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील २४ तासांत पुणे, नागपूर, परभणी, अकोला, कोल्हापूर, औरंगाबाद, हिंगोली, सातारा आणि अहमदनगर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून, काही ठिकाणी एक ते दोन जोरदार सरी होण्याची शक्यता देखील आहे. त्यानंतर मात्र उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हवामान चांगले राहील अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com