संपूर्ण राज्यात हवामान कोरडेच असून, ऑक्टोबर महिन्यात अत्यंत कमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. ज्याचा विपरीत परिणाम पिकांवर दिसून येत आहे.
राज्यात मुख्यतः ३ पिकांचे म्हणजेच सोयाबीन, कापूस आणि ऊस यांचे उत्पादन होते, ज्यापैकी सोयाबीन पिकाची कापणी आधीच पूर्ण झालेली असल्यामुळे कमी पावसाचा कोणताही परिणाम या पिकावर दिसला नाही.
दरम्यान आता कापसाची दुसरी वेचणी सुरु झालेली असून, तुरळक पावसाचा तसेच कोरड्या हवामानाचा कोणताही विपरीत परिणाम कापूस पिकावर होणार नाही.
याउलट, सध्याच्या कोरड्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम सध्याच्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या ऊस पिकावर निश्चितच होईल असे दिसत आहे. वाढीच्या काळातच ऊस पिकाला पाण्याची जास्त आवश्यकता असते, म्हणूनच सध्याच्या कोरड्या परिस्थितीचा परिणाम ऊसाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर होणे अपेक्षित आहे.
साधारणपणे, ऑक्टोबर महिन्यात पावसामुळे जमिनीत ओलावा राहतो ज्याचा फायदा रब्बी पिकांना होतो. परंतु यावर्षी सध्याच्या कोरड्या हवामानाचा आणि पुढील ८-१० दिवस राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नसल्यामुळे रब्बी पिकं निश्चितच प्रभावित होणे अपेक्षित आहे.
येणाऱ्या दिवसात किमान तापमानात किरकोळ वाढ अपेक्षित आहे, परंतु याचा प्रभाव नगण्य असून राज्यात आल्हाददायक वातावरण प्रस्थापित होणे अपेक्षित आहे.
आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:
मुंबईत कमाल तापमान 36 अंश से. आणि किमान 22 अंश से. असण्याची शक्यता आहे.
नाशिक मध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान 14 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
पुणे येथे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 अंश राहण्याची अपेक्षा आहे.
वर्धा येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.
अकोला येथे दिवसा तापमान 36 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
नागपूर येथे दिवसा तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 14 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.